Trends of uploading photos from 20 years ago on Facebook 
पुणे

फेसबुकवर जुन्या फोटोंना उजळा;  20 वर्षांपूर्वीचे फोटो अपलोड करण्याचा ट्रेंड 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : फोटोच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल मिडिया सगळ्यांच्या मनोरंजनाचा एक चांगला पर्याय ठरला आहे. त्यामुळे त्यावर रोज नवनवीन ट्रेंड सुरू करण्यात येत आहेत. असाच एक नवा ट्रेंड सध्या सुरू आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या वर्षी म्हणजेच 2020च्या अंतर्गत #20 इयर्स चॅलेंज स्वीकारत आता 20 वर्षे जुने फोटो फेसबूक, टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर शेयर करण्यात सगळे व्यस्त झाले आहेत. तर काही लोक 20 वर्षांपूर्वी सारखा फोटो पुन्हा काढत आहेत व या दोन्ही फोटोंमधला त्यांचा जीवन प्रवास कसा बदलला ते दाखवत आहेत. याचबरोबर आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा यामध्ये टॅग करत त्यांना देखील असे फोटो टाकण्याचे चॅलेंज करत आहेत. फेसबूकवर आपल्या 20 वर्षांचा जुना फोटो टाकताना काही ओळी सुद्धा लिहिल्या जात आहेत.


Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत

#20 इयर्स चॅलेंज
क्या आप ये कर सकते हैं???? 
चलो कुछ हट के करे, अपने आप को नटखट करे,
डालिये अपनी फोटो कम से कम 20 साल पुरानी, उसी पुराने अंदाज़ में ...

या चॅलेंज च्या माध्यमातून कोणी आपल्या आई वडिलांच्या सोबतचे नाते आजही तसेच असल्याचे सांगत आहेत , तर काही जण आपल्यातील घडलेला बदल या बाबत भावना व्यक्त करीत आहेत. एकंदरीत या वीस वर्षांमध्ये आपण कसे बदललो याचाच प्रमाण म्हणून हा चॅलेंज.

Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत
"महाबळेश्वरमध्ये या ठिकाणी मी वीस वर्षांपूर्वी फोटो काढला होता. तर दोन महिन्यांपूर्वी पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीत फोटो काढला. आज हे दोन्ही फोटो टाकत असताना मला माझातील झालेले काही बदल पाहून पुन्हा त्या वर्षात गेल्या सारख वाटत आहे. माझा हा वीस वर्षांचा प्रवास माझ्या डोळ्या समोर पुन्हा आला."
- छाया गरजे, गृहिणी

Corona Virus : पुण्यात 4 तास बेवारस मृतदेह रस्त्यावर, कोरोनाची भीती? मागत होता 'ही' औषधे

"वीस वर्षांमध्ये काहीच बदललं नाही असं वाटत आहे. लहानपणी बाबा असेच मला आणि माझा भावाला अभ्यासाला मदत करायचे. आता महाविद्यालयात आल्याने आमचा अभ्यास आम्हीच करतोय, पण वीस वर्षांपूर्वी ज्या प्रकारे बाबा आमचे अभ्यासाचे धडे घेत असे, त्या क्षणाला आम्ही पुन्हा फोटोत सामावून घेतले आहे. "
- शोएब अन्सारी, विद्यार्थी
पुणे पोलिसांकडून पासही रद्द : घराबाहेर पडणाऱयांवर कडक कारवाई; 'हे' आहेत नवीन नियम​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT