पुणे

आदिवासी विद्यार्थ्यांचे सहा ऑगस्टला राज्यव्यापी ठिय्या अंदोलन

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक - महाराष्ट्रातील २९ प्रकल्प कार्यालयावर सोमवार ता.६ ऑगस्टला आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी तसेच आदिवासी समाज बांधव राज्यव्यापी ठिय्या अंदोलन धरणार आहेत. मागील महिन्यात पुणे नाशिक पायी शिक्षण संघर्ष  मोर्चा काढला होता. साधारणपणे १६० किलोमीटर अंतर पायी चालून आलेल्या विद्यार्थ्यांना नांदूर शिंगोटे नाशिक येथे अटक करण्यात आले होते.

या पायी संघर्ष मोर्च्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पाय सुजले होते, पायाच्या टेचाला भेगा पडल्या होत्या,खाण्यापिण्या अभावी काहीना अशक्तपणा देखील आला होता. अटक केलेल्या विद्यार्थ्यांना रात्रभर डांबून धरले होते, या अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिष्टमंडळाच्या चर्चा केली पण त्यात कोणतेच आश्वासन ठोस दिले नाही. किंवा त्याची अद्याप कोणतेची पूर्तता केली नाही.विधिमंडळात या प्रश्नावर झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन झाले नाही. मुख्यमंत्रींनी केलेले निवेदन बेजबाबदारपणाचे होते, तर आदिवासी मंत्री, आमदारांनी देखील या प्रश्नांकडे गांभीर्याने चर्चेत सहभाग घेतला नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनने केला आहे.

भरत तळपादे, अमोल दरेकर, सतिष असवले, राम कवटे आदि कार्यकर्त्यांनी आदिवासी मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील समस्या मांडल्या. राज्य सरकार डीबीटी, पंडीत दीनदयाळ स्वयम योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. चार ते पाच वर्षापासून या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. नव्याने शासकीय वस्तीगृह इमारती बांधल्या जात नाही. वेळेवर शैक्षणिक उपलबद होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

५ एप्रिल २०१८ ला काढलेला डीबीटी शासन निर्णय रद्द करावा, शासना मार्फत खानावळी सुरू ठेवाव्यात,शिक्षण संघर्ष मोर्च्यात विद्यार्थ्यांना अटक करणा-या पोलीसांवर कारवाई करावी. वस्तीगृह, शिष्यवृत्ती तसेच वैयक्तीक लाभाच्या योजना ऑफलाईन पद्धतीने भराव्यात, पेसा अंतर्गत येणा-या सर्व जागा भराव्यात, ६ जुलै २०१७च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करावी. मंजूर झालेली वस्तीगृहे तातडीने बांधवीत, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी याला प्राधान्य द्यावे. वस्तीगृह प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र सक्तीचे करावे या मागण्यासह अन्य मागण्यांसाठी हे ठिय्या अंदोलन केले जाईल.

भरत तळपादे म्हणाले, "राज्यातील सर्व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर आदिवासी विद्यार्थी संघटना, विविध समाजिक संघटना, समाजबांधव या ठिय्या अंदोलनात सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT