PNE
PNE 
पुणे

आदिवासी महिलांना सीताफळ विक्रीतून रोजगार

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पहाडदरा येथील दीडशे जणींकडून कुटुंबास आर्थिक हातभार

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पहाडदरा गावातील आदिवासी ठाकर समाजातील महिलांनी डोंगरदऱ्यातून सीताफळ गोळा करून त्याच्या विक्रीतून हक्काचा रोजगार मिळविला आहे. परिसरातील 100 ते 150 महिला गेल्या दोन महिन्यांपासून हे काम करीत आहेत.


चारही बाजूने डोंगरांनी वेढलेल्या पहाडदरा गावात पावसाळ्यात ओढ्या-नाल्यांना पूर, तर उन्हाळ्यात पाण्याचा टॅंकर सुरू करावा लागतो. या भागातील महिला बागायती गावांत रोजगारासाठी जातात. परिसरातील डोंगरावर सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सप्टेंबर, ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात सीताफळांचा बहर असतो. प्रत्येक कुटुंबातील महिला दिवसभर डोंगरदऱ्यात भटकंती करून सीताफळ गोळा करतात. ती आसपासच्या गावात विक्रीसाठी नेतात. त्यामधून रोजगार मिळतो. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सीताफळाच्या झाडांनाही बहर चांगला होता. सीताफळे मोठ्या प्रमाणात लगडली आहेत. त्याच्या विक्रीतून सुमारे 100 ते 150 महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे, अशी माहिती सोनूबाई गणपत केदारी, शीतल उल्हास कडाळे, लीलाबाई सर्जेराव कडाळे, संजना विलास पडवळ, हौसाबाई ढवळेराम पडवळ, सोनाबाई गजानन केदारी यांनी दिली.

पूर्वी महिला डोक्‍यावर पाटी घेऊन आसपासच्या गावांत पायपीट करत सीताफळ विक्री करायच्या. यात वेळ व कष्ट जास्त असायचे, पण पैसे कमी मिळायचे. आता गावातच व्यापारी ठोक भावात एक 20 किलोचे क्रेट 200 ते 250 रुपयांना खरेदी करून नेत आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती माजी उपसरपंच विलास पडवळ तसेच, आई काळुबाई व तुळजाभवानी माता सेवा ट्रस्टचे विश्वस्त कैलास वाघ यांनी दिली.

डोंगरदऱ्यातील सीताफळांच्या झाडांना रासायनिक खते टाकली जात नाहीत. तसेच औषध फवारणीही केली जात नाही. ही सीताफळे पूर्णपणे सेंद्रिय आहेत. त्यामुळे येथील सीताफळांना मागणी कायम असते. भविष्यात येथील महिलांना एकत्र करून सीताफळ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध करण्याचा मानस पहाडदऱ्याच्या सरपंच राजश्री कुरकुटे यांनी व्यक्त केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT