राजगुरूनगर : खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांना आज विधीमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी त्यांचा संयमी, मितभाषी मात्र कृतिशील अशा शब्दांत गौरव केला, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सकारात्मक व अजातशत्रू असे संबोधले. त्यांच्या कारकिर्दीतील भामा आसखेडहून पुण्याला पाणी नेण्यासंबंधीच्या प्रश्नाबाबतच्या आठवणी नेत्यांनी सांगितल्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हिवाळी विधिमंडळाचे अधिवेशन आज सुरू झाले. दरम्यान १० ऑक्टोबर रोजी गोरे यांचे निधन झाले. त्यामुळे विधिमंडळ प्रथेप्रमाणे प्रथमतः दिवंगत आजीमाजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोरेंविषयी बोलताना ठाकरे म्हणाले,' गोरे हे साधे, नम्र आणि मितभाषी होते, पण आपल्या कार्यातून त्यांनी कर्तृत्व दाखविले. तळागाळातील त्यांच्या कामामुळेच ते विजयी होऊ शकले. त्यांना ग्रामीण व शहरी दोन्ही प्रश्नांची जाण होती. प्रश्न धसास लावण्याची त्यांची विलक्षण हातोटी होती. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व हरपले आहे. '
पराभव झाल्यानंतरही त्यांच्या कामात खंड पडला नाही. कामांसाठी मेसेज व व्हाट्सएपच्या माध्यमातून ते पाठपुरावा करायचे. आता ते मेसेज थांबले आहेत, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
फडणवीस म्हणाले, ''सुरेश गोरे जनतेचे प्रश्न नेटाने मांडत असत. मी मुख्यमंत्री असताना भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याबाबत समस्या होती. पाईपलाईनचे काम त्यांनी काम बंद पाडले. मात्र त्या समस्येबाबत ते सकारात्मक राहिले. पुनर्वसनाचे प्रश्न सुटावेत, अशी त्यांची भूमिका होती.''
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.