pune-railway-station pune-railway-station
पुणे

पुणे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रवाशांना त्रास

रेल्वे स्थानकावर सत्यता पडताळली असता ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्याचे समोर आले.

सकाळ वृत्तसेवा

रेल्वे स्थानकावर सत्यता पडताळली असता ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्याचे समोर आले.

पुणे - रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) आई-वडिलांना सोडण्यासाठी गेलो होतो. मात्र प्लॅटफॉर्म तिकिटासाठी (Platform Ticket) कोणतीही ऑनलाइन सुविधा (Online Facility) नसल्याने सुट्या पैशांसाठी धावाधाव झाली. रोख असतील तर पैसे द्या; अन्यथा रांगेतून बाहेर होण्याचा अजब सल्ला तिकीट विक्रेत्या कर्मचाऱ्याने दिला. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला, असा अनुभव राकेश ठेकळे यांनी सांगितला.

रेल्वे स्थानकावर याबाबतची सत्यता पडताळली असता ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्याचे समोर आले. तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवासी आणि त्यांच्या नातेवाइकांशी चर्चा केली असता, ‘‘अनेकदा पैसे सुटे नसतात, त्यामुळे तिकीट खरेदी करताना त्रास सहन करावा लागतो. सुटे पैसे आणण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक वेळा प्रवाशाला एकट्यालाच सोबत असलेले साहित्य घेऊन जावे लागते, असे सांगण्यात आले.

केंद्र सरकारकडून देशभरात डिजिटल इंडिया मोहीम राबविली जाते. या मोहिमेनुसार ऑनलाइन सुविधा देण्यासोबतच ऑनलाइन व्यवहार करावेत, असाही आग्रह धरला जातो. यूपीआय आयडीच्या माध्यामातून छोट्या ते मोठ्या व्यवहारांसाठी पसंती दिली जात असून, ते नागरिकांना सोयीचे ठरत आहे. असे असताना रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा अद्याप का सुरू करण्यात आली नाही? पैसे सुटे नसल्याने तिकीट नाकारले जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जाऊ इच्छिणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे विभागाने हा त्रास ओळखून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मोनिश शर्मा प्रवाशाने केली.

या भागाच्या मुख्यालयाला प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ही सेवाच काही दिवसांत रेल्वे विभागाच्या अधिकारात जाणार आहे. त्यामुळे आता हा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला जाऊ शकतो, असे पुणे विभागाच्या आयआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडियन रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विभागातर्फे (आयआरडीसी) प्लॅटफॉर्म तिकिट विक्री केली जाते. त्यामुळे ही सेवा थेट रेल्वे विभागाच्या अधिकारात नाही. काही दिवसांत ही सेवा रेल्वे विभागाच्या अधिकारात येणार आहे. ऑनलाइन पेमेंट सुविधेसाठी रेल्वे कठिबंध आहे. कारण दिवसाला एक हजार ते बाराशे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे, याची जाणीव रेल्वेला आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT