Truck accident on Pune-Solapur road Traffic jam 
पुणे

पुणे-सोलापूर रोडवर ट्रकचा अपघात,वाहतूक खोळंबली

दीपक शिंदे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबईवरून लातूरला निघालेला ट्रक पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी येथे सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान बस स्टॉपच्या कठड्याला धडकून पलटी झाला. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(Truck accident on Pune-Solapur road Traffic jam)

पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी येथे बस स्टॉपच्या कठड्याला धडकून ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अनेक वेळा नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी तक्रार करून देखील हा कठडा येथून हटविण्यात आला नाही. गेल्या आठवड्यातच टेम्पो ट्रॅव्हलरची धडक बसून टेम्पो ट्रॅव्हलरचे देखील मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, आज ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी ते काळुबाई चौक येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे .वाहतूक कोंडी कमी करण्याचे काम वाहतूक पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

FDA Crime : पळा पळा अधिकारी आले...; दुकाने बंद करून अनेक व्यापारी गेले पळुन

Khadakwasala Bridge : खडकवासला पुलाचे आयुष्य वाढले; जड वाहतूक लवकरच होणार सुरू

Pune News : जलपर्णी काढण्यासाठी चार वर्षांत आठ कोटींची उधळण

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

SCROLL FOR NEXT