truck and car accident on sinhgad road 3 injured of family include baby haveli traffic police  sakal
पुणे

Pune Sinhagad Road Accident : सिंहगड रस्त्यावर भरधाव डंपरने कारला चिरडले; लहान बाळासह 3 जखमी

हवेली पोलिस घटनास्थळी दाखल

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी(एनडब्ल्यूए) जवळ भरधाव डंपरने एका कारला चिरडले असून या अपघातात एका लहान बाळासह तिघेजण जखमी झाले आहेत.

अपघाताची तीव्रता एवढी होती की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे, सुदैवाने यात तिघांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अल्टो कार खडकवासला बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय जल अकादमी समोर मागून आलेल्या भरधाव अवजड डंपरने कारला जोरदार धडक देऊन सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरफटत नेले.

डंपरच्या धडकेने कारची दिशा बदलून कार दुभाजकावर चढली. कारमधील लहान बाळ व इतर दोघांना नागरिकांनी कारमधून बाहेर काढले व उपचारांसाठी नेण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून डंपर व अपघातग्रस्त कार बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

डंपर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत. सातत्याने अपघात होत असल्याने या रस्त्यावर गतीरोधक करण्याची मागणी करण्यात येत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT