A truck full of CNG caught fire in front of a petrol pump kedgav pune
A truck full of CNG caught fire in front of a petrol pump kedgav pune 
पुणे

सीएनजी भरलेला ट्रक आगीत भस्मसात, तेही पेट्रोल पंपासमोरच

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : शिरूर-सातारा मार्गावर केडगाव ( ता.दौंड ) जवळ सीएनजी गॅसचा ट्रक पलटी होऊन पेटल्याने जळून खाक झाला. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग सुमारे १०० फुट उंचीपर्यंत गेली. हा अपघात सोमवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोर घडला. सुदैवाने पेट्रोलपंपास कोणतीही हानी झाली नाही.  या अपघातात जिवीतहानी नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद होती.  

न्हावरा ( ता.शिरूर ) येथील टोरँटो गॅस फिलिंग स्टेशन येथून निघालेला गॅस ट्रक ( एम.एच.४६ एफ ३३७८)  पहाटे दिड वाजण्याचा सुमारास खोपोडी गावच्या हद्दीत दीपक ताकवणे यांच्या पेट्रोलपंपासमोर पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ट्रकने पेट घेतला. आगीत ट्रकमधील सीएनजी गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग उग्र झाली. अपघातानंतर पेट्रोलपंपातील कर्मचा-यांनी १०० नंबरला फोन केल्याने यंत्रणा तातडीने सक्रीय झाली. आग विझविण्यासाठी दौंड नगरपालिका, कुरकुंभ एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी साडेतीन वाजता आग नियंत्रणात आणली.  

सीएनजी टाक्यांचा स्फोट होऊ लागल्याने पेट्रोलपंप व शेजारील हॅाटेलमधील कर्मचारी दूर पळाले.  पेट्रोलपंपासमोर घटना घडूनही सुदैवाने पंपास कोणतीही हानी पोहचली नाही. पंपापासून शंभर फुटावर हा ट्रक जळाला.  पेट्रोलपंपात २० हजार लिटर डीझेल व ६ हजार लिटर पेट्रोल होते. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय कापरे यांनी तातडीने घटना स्थळाला भेट दिली. पहाटे साडेतीन वाजता वाहतूक सुरू करण्यात आल्याचे कापरे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT