Truck Hit 7-8 vehicle again near Navale bridge pune 
पुणे

पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात; 7-8 वाहनांना धडक

विठ्ठल तांबे

पुणे(धायरी) : पुण्यात वाहतूकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या नवले पुल येथे आज पुन्हा अपघात झाला आहे. टॅ्कने जोरदार धडक दिल्याने 7 ते 8 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. अपघतानंतर ट्रक डाईव्हर फरार झाला असून क्लिनर ला संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

साधारण सुमारे 12.15 च्या आसपास कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने 7-8 वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 7 कार एक दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलेच्या अंगावर स्फिट कार गेल्याने किरकोळ जखमी झाली आहे. 

नशीब बलवत्तर म्हणून बचावले
बालेवाडी स्टेडियम येथे क्रिकेट खेळण्यासाठी निघालेली 7 ते 8 लहान मुलांच्या बॅलेरो कारला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की कार रस्त्याच्या मधील डिव्हाईडवर जाऊन अडकली. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावले. अचानक झालेल्या या अपघातामुळे लहान मुले धास्तावली आहेत.

दरम्यान, अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस, पुणे वाहतूक पोलिस दाखल झाले असून. रस्त्यावरील गाड्या हटवून रस्ता मोकळा केला आहे.

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT