Trucks transporting 22 tons of waste in one round pune municipal corporation
Trucks transporting 22 tons of waste in one round pune municipal corporation sakal
पुणे

Pune : एका फेरीत २२ टन कचरा वाहतूक करणारे ट्रक महापालिकेच्या ताफ्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढत असताना त्याचा ताण कचरा वाहतुकीवर देखील पडत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ही वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिकेने २० ते २२ टन कचर्याची वाहतूक करणारे तीन ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहेत दाखल करून घेतले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या ट्रकचे लोकार्पण करण्यात आले.

सारसबाग येथील सरस ग्राउंड येथे या ट्रकचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. आमदार भिमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार , कीथ कंपनीच्या अध्यक्षा लिंडसे फॉस्टर ड्रॅग्रो, संचालक वरून गजरा, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यावेळी उपस्थित होत्या.

केंद्रशासनाने १५व्या वित्त आयोगा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रायोगिक तत्वावर सुमारे अडीच कोटी रूपयांचे हे तीन ट्रक खरेदी करण्यात आले आहेत. या ट्रक मध्ये वॉकिंग फ्लोरची यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. ही यंत्रणा चालविण्यास सोपी असून महापालिका कर्मचाऱ्यांनाच याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महापालिकेकडून सध्या शहरात कचरा वाहतूकीसाठी हायवा ट्रक वापरण्यात येतात. त्यांची क्षमता ५ ते १० टन आहे. या ट्रक मध्ये कचरा भरल्यानंतर तो आत मध्ये दाबण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे चरा भरण्यासाठी व उतरविण्यासाठी अर्धा ते पाऊन तास जातो . तसेच कचरा मोठया प्रमाणात बाजूला पडतो.

या नवीन ट्रक मध्ये वॉकिंग फ्लोर असून कचरा १० मिनिटात भरता येतो. आत मध्ये पडलेला कचरा स्वयंचलित यंत्रणेत दाबला जातो. परिणामी, जुन्या हायवाच्या तीन ट्रक मध्ये बसणारा कचरा कीथच्या एकाच ट्रक मध्ये बसतो. परिणामी, कचरा वाहतूकीचा खर्चही कमी होणार आहे. शिवाय, गाडी रिकामी करताना कचऱ्याचे सांडण्याचे प्रमाणही कमी होते, अशी माहिती अशा राऊत यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT