Beating
Beating Sakal
पुणे

माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट - माचिस नाही असे सांगितल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडला आहे. हा प्रकार कॅम्पमधील कुरेशी मस्जिदजवळ सोमवारी रात्री घडला.

याप्रकरणी आशिष महेंद्र शर्मा (वय ३२, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आशिष शर्मा व त्यांचा मित्र हे सिगारेट पिण्यासाठी कोच लेनमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या एका मुलाने फिर्यादीकडे माचिस मागितली. तेव्हा फिर्यादी याने त्यांना आमच्याकडे माचिस नाही, असे सांगितले. त्यावर लाल टी शर्ट घातलेल्या मुलाने “हमे माचिस नही देता क्या” असे बोलून टपरीवर असलेला लोखंडी रॉड काढून अब तेरा मर्डर कर डालता” असे बोलून फिर्यादी यांच्या डोक्यावर मारला. त्यांना खाली पाडून दुसर्‍या आरोपीने बांबुने फिर्यादीच्या पाठीवर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. लष्कर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT