tulshibag 
पुणे

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील महिलांचे आणि तरुणांच्या खरेदीचे सर्वात आवडतीचे ठिकाण असलेली तुळशीबाग गेली 2 महिने बंद आहे. परंतु, आता तुळशीबाग 1 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय होत आहे.

पुणे शहरातील महिलांची खरेदीसाठी तुळशीबागेत नेहमीच गर्दी असते. मात्र, लाॅकडाउनमुळे गेली दोन महिने तुळशीबाग बंद आहे. आता मात्र  1 जूनला तुळशीबाग सुरू करण्याचे विचार सध्या सुरू असून, दुकानदारांनी व कामगारांनी दुकानांची सफाई सुरू केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 ते 18 मार्चपर्यत तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. त्यानंतर राज्याने आणि नंतर केंद्राने लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद होती. मात्र, तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रातही नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरू करण्याचा विचार आहे. त्याच बरोबर दुकाने सुरू करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षा रक्षक नेमणार आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणार असून, ग्राहकांचे तापमान तपासणार आहेत, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित व व्यापाऱयांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT