पुणे

बोगद्याच्या कामामुळे घरांना तडे...विहिरींचे पाणी गायब...

राजकुमार थोरात

वालचंदनगर : मराठवाड्याचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या नीरा-भीमा स्थिरीकरण नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामामुळे सपकळवाडी (ता. इंदापूर) परीसरामध्ये बोगद्याशेजारी घरांना तडे व विहिरींचे पाणी गायब झाल्याने शेतकरी चितांग्रस्त झाले आहेत.

इंदापूर तालुक्यामध्ये तावशी ते भादलवाडी दरम्यान नीरा- भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. २३.८० कि.मी प्रकल्पाची लांबी असून बोगद्याची लांबी २२.२४ कि.मी आहे. तसेच बाेगद्यची उंची ८ मीटर व रुंदी ८.२५ मीटर असून सुमारे बोगद्याची खोली ४३ ते ८३ मीटर आहे. आत्तापर्यंत बोगद्याचे सुमारे १४ कि.मी.लांबीमध्ये काम पूर्ण झाले आहे.

सपकळवाडीमध्ये जमीनीपासुन सुमारे ५० मिटर खालून बोगद्याचे काम सुरु आहे. सध्या एक  क्रंमाकाच्या शाप्टपासुन २९० मीटर लांबीमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. लोकवस्तीमधून बोगदा जाणार आहे. मात्र हे काम करीत असताना ब्लॉस्टिंगमुळे सपकळवाडी परीसरातील सुमारे १० शेतकऱ्याच्या घराला तडे गेले जावून काही शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी ही गायब झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महेंद्र महादेव सपकळ यांनी सांगितले की, माझे सुमारे १० वर्षापूर्वी पत्र्याचे व स्लॅबचे बांधलेले घर आहे. घराजवळ बोगद्याचे काम सुरु असल्याने पत्र्याच्या घराच्या भिंतीला तडे गेले असून स्लॅबच्या भिंतीला तडे जावू लागले आहेत.

शेतकरी जगदीश सपकळ यांनी सांगितले की, माझी विहिरी ३० ते ३५ फुट खोल आहे. ३५ फुटापर्यंत पाषाण नाही.दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी अपुरे पडते. मात्र चालू वर्षी बोगद्याचे कामामुळे हिवाळ्यामध्ये पाणी कमी पडत आहेत.तसेच विंधन विहीरीचे पाणी ही कमी पडले असून उन्हाळ्यामुळे पिकांचे नुकसान होणार आहे.

बागायती पट्टा होणार दुष्काळी पट्टा्...
इंदापूर तालुक्यामध्ये चालू वर्षी दुपटीपेक्षा जास्त पाऊस पडला. सध्या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे. बोगद्याजवळील विहिरींना पाणी कमी पडू लागल्याने चितेंचा विषय झाला असून बोगद्यामुळे विहिरींचे पाणी कमी होत असल्यास बागायती पट्याची ओळख दुष्काळी पट्टा होवू शकते. 

यासंदर्भात नीरा-भिमा जोड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे यांनी सांगितले की, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने तडे गेलेल्या घरांचे पंचनामे व पाणी कमी झालेल्या विहींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात भू-वैज्ञानिक तज्ज्ञ डॉ. बी. एम. करमकर यांनी सांगितले जमीनीमध्ये कोणत्या प्रकारचा खडक आहे, यावरती बोगद्यामुळे घरांच्या भिंतीला तडे पडतात का? किंवा पाणी जाते का हे अवलंबून असते. सदरच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर बोगद्याचा काय परीणाम झाला आहे हे सांगता येईल. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Update : कोयना, महाबळेश्वर, नवजाला पावसाने झोडपले! धरणाचा पाणीसाठा 27 TMC पार, पाहा ताजी आकडेवारी, पाणीसाठ्यात रेकॉर्डब्रेक वाढ

Latest Marathi News Live Update :खंडाळा घाटात दरड कोसळली; पुणे–मुंबई रेल्वे वाहतुकीला मोठा फटका, सहा एक्स्प्रेस रद्द

Mumbai Pune Rain Alert : कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुंबई,पुणे परिसरात पुढील २ दिवस रेड अलर्ट, नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Petrol-Diesel Price: कच्चे तेल आणखी स्वस्त! 6 जुलैचे इंधनाचे नवे दर जाहीर! पेट्रोल-डिझेल-CNG किती रुपयांना?

Hingoli: रस्त्याची चाळण; हिंगोलीकरांचा संताप; रिसाला नाका ते आदर्श महाविद्यालय मार्गाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT