turnover of fifty thousand in Bal Anand Mela zilla parishad school student pune
turnover of fifty thousand in Bal Anand Mela zilla parishad school student pune sakal
पुणे

Pune News : अवसरी बुद्रुकच्या विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्यात पन्नास हजाराची उलाढाल

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजी पाला, पाणी पुरी, ओली भेळ, आईस्क्रीम, वडापाव असे विविध पदार्थांचे स्टॉल लाऊन त्याची विक्री केली ग्रामस्थांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला एकूण १५० स्टॉलच्या माध्यमातून एकूण ५० हजार रुपयांची उलाढाल झाली.

बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर एलभर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश हिंगे, उपाध्यक्षा गीतांजली हिंगे, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे व सर्व सदस्य उपस्थित होते.

बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजी पाला, पाणी पुरी,ओली भेळ, आईस्क्रीम, वडा पाव , सामोसे, मिसळ, लस्सी, ताक, इडली, मोमोज, मेंदु वडा, गुलाबजामू, चायनीज पदार्थ,लाडूचे विविध प्रकार असे विविध पदार्थ विक्रीसाठी आणले होते मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉल वर जात खरेदी केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान काय असते, नफा तोटा तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता आहे की नाही याची जाणीव यातून झाली. मेळाव्याला सरपंच पवन हिले, उपसरपंच शीलत हिंगे, ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे, प्रशांत वाडेकर, सुनील पाटील हिंगे, गुलाब हिंगे, दीपक चवरे, किशोर हिंगे, अंकुश टाव्हरे, अशोक योगीराज हिंगे, सर्जेराव हिंगे पाटील, ग्रामसेवक जयवंत मेंगडे आदींनी भेटी दिल्या.

मेळाव्याची व्यवस्था मुख्याध्यापक हेमंत विटकर, शिक्षक राम गुरूव, उदयकुमार लोंढे, अनिल वरे, प्रतिभा शिंगाडे, सरस्वती लबडे, गीतांजली लोंढे, सुजाता जारकड, जयश्री चव्हाण, युगंधरा गाडेकर, नवनाथ धुमाळ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT