पुणे

कऱ्हेच्या पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना मिळालं जीवदान

मिलिंद संगई

बारामती : शहरातील कऱ्हा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन सख्ख्या भावांना पोलिस व स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले. सोमवारी (ता. १२) दुपारी हा प्रकार घडला.

बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्गालगत जुन्या पुला जवळ पाण्यात तोल जाऊन पडलेल्या दोन युवकांना पोलिसानी स्थानिक तरुणांच्या मदतीने जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. 

दोन दिवसांपासून बारामती परिसरात पावसाच्या जोरदार पाऊस पडत आहे,  शिवाय नाझरे धरणातूम सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. घटस्थापनेमुळे सोमवारी एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी आलेल्या ऋतू हिम्मत भोसले (वय १८) व बंटी भोसले (वय १६) हे दोन भाऊ कपडे धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले. त्यांनी  पुरात वाहून गेलेल्या लहान पुलाला पकडून ठेवले, मात्र हा पूल वाहून गेला असल्याने सिमेंटच्या पाईपमध्ये अडकून पडले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वरून पाण्याच्या प्रचंड दबावाने त्या दोघांना पाण्यातून बाहेर येता येत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस व स्थानिक तरुण मदतीला धावले व जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बंटी भोसलेला बाहेर काढण्यात यश आले. तर ऋतू मात्र पाण्यातील झुडपात अडकवून बसला होता व मदतीची याचना करत होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी तेथे असणाऱ्या साडीच्या मदतीने किशोर लोखंडे याने सावधपणे ऋतूला बांधत विरुद्ध दिशेला ओढले याच वेळी पोलिसांनी या तरुणाला वर ओढून त्याचे प्राण वाचवले घडलेला प्रकार लक्षात आल्यावर फौजदार पद्मराज गंपले व योगेश शेलार, पोलिस कर्मचारी पोपट नाळे ,राजभाऊ गायकवाड, तुषार चव्हाण, बापू इंगुले, होमगार्ड पी. खांमगळ, बारामती नगर परिषदेचे अधिकारी संजय प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव, किशोर लोखंडे या तरुणांनी दोघांचे प्राण वाचवले.

(संपादन : सागर दिलीपरावव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT