Pune_Police 
पुणे

पुणे पोलिस 'अॅक्‍शन मोड'वर; शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा 'हल्लाबोल'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे पोलिस 'अॅक्‍शन मोड'वर आले आहेत. गेल्या दोन दिवसात गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 38 जणांना अटक केली. या कारवाईत जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरात काही प्रमाणात खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्याची गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेत वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिला होता. त्याचबरोबर किरकोळ व गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अवैध धंद्यांवरही कारवाई करण्यास सांगितले होते. 

त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील मध्यवर्ती भागासह स्वारगेट, दत्तवाडी, वारजे, येरवडा, हडपसर, बंडगार्डन, सहकारनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या ठिकाणांवर गेल्या दोन दिवसांपासून छापे घालण्यास सुरवात केली होती. विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करून पोलिसांनी 38 जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य तसेच रोकड असा 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांनी बेकायदा गावठी दारू तसेच ताडी विक्री प्रकरणात सात गुन्हे दाखल केले. या कारवाईत 464 लिटर गावठी दारू, 120 लिटर ताडी जप्त केली. त्यामध्येही सात जणांना अटक केली. तसेच तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विक्री प्रकरणातही पोलिसांनी कारवाई केली. त्यानुसार कोंढवा भागातील अजमेरा पार्क परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत टेम्पो तसेच गुटख्याची पोती असा 15 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्वारगेट परिसरात अमली पदार्थांची विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT