daund.jpg 
पुणे

दाैंड तालुक्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पाच व दौंड शहरातील चार, असे एकूण नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या वसाहतमध्ये राहणार्या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. दोन जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या कर्मचारी वसाहत मधील एकाच कुटुंबातील चार जणांना बाधा झाली आहे. सदर कुटुंब संगमनेर येथून नाशिक येथे एका रूग्णास भेटण्यासाठी गेले होते. आलेगाव येथे परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने दौंड शहरातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पाठविले असता पती, पत्नी व दोन मुले, असे एकूण चार जणांना बाधा झाली. केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत एका कंपनीजवळ राहणार्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने एका ४२ वर्षीय नागरिकास कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांवर स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून २६ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी शहरातील ख्रिश्चन कॅालनी जवळील अपार्टमेंट मधील ६७ वर्षीय महिला, शिवराज नगर येथील ५१ वर्षीय महिला, समतानगर येथील ४५ वर्षीय महिला आणि सरपंच वस्ती येथील ३४ वर्षीय तरूण, असे एकूण चार जणांना बाधा झाली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

दरम्यान १८ जुलै रोजी लिंगाळी (ता. दौंड) येथील सावरकरनगर येथील ४५ वर्षीय बाधित तरूणाचा पिंपरी - चिंचवड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर १९ जुलै रोजी दौंड शहरातील एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 

by : Sagar Shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT