Two girls who went to swim in Khadakwasla dam drowned 7 girls rescued in pune  
पुणे

Pune News : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्या; सात मुलींना वाचविण्यात यश

निलेश बोरुडे

सिंहगड : खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. (Two girls in Khadakwasla dam)

गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या असता जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले तर दुर्दैवाने अंदाजे सोळा ते सतरा वयाच्य दोन मुलींचा शोध लागला नाही.

स्थानिकांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली असता पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व पोलीस हवालदार दिनेश कोळेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून थोड्याच वेळात जवान पोहोचतील अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT