Two killed in road accident pune police truck traffic police fursungi
Two killed in road accident pune police truck traffic police fursungi esakal
पुणे

Pune Accident News : हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.

संतोष शिवाजी हरपळे (वय ३७ रा. इंदिरा वसाहत, फुरसुंगी) आणि लक्ष्मण अण्णासाहेब पाटील (वय ३५, रा. चंदवाडी, फुरसुंगी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश चोरघडे (वय ३७, रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि लक्ष्मण हे दोघे फुरसुंगीतील जुन्या कालव्याजवळ मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोलत उभे होते. त्या वेळी दहाचाकी भरधाव ट्रकने दोघांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT