लोहगाव - विमानतळावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने ‘टू लेन’ सिस्टीम सुरू केली आहे.
लोहगाव - विमानतळावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने ‘टू लेन’ सिस्टीम सुरू केली आहे. 
पुणे

लोहगाव विमानतळावर ‘टू लेन सिस्टिम’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे स्वागत केले आहे.

लोहगाव विमानतळाच्या आवारात प्रवाशांना ड्रॉप करण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनांची गर्दी होत होती. त्यामुळे कोंडी निर्माण होऊन प्रवाशांमध्ये गोंधळ होत असे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सप्टेंबरमध्ये बॅरिकेड घालून दोन लेन तयार केल्या. पिकअप आणि ड्रॉपसाठी स्वतंत्र लेन झाल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रयोग कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

त्यानुसार गेल्या आठवड्यापासून ‘टू लेन सिस्टिम’ तयार करण्यात आली आहे. आवारात प्रवेश करताना या लेनची माहिती वाहनचालकांना मिळत आहे. त्यामुळे संबंधित लेनमध्ये वाहनचालक गेला, की प्रवाशांचीही सोय होत असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘प्रवाशांना पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी दोन स्वतंत्र लेन केल्या आहेत. त्यानंतर त्या दोन्ही लेन विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी पुढे एकत्र करण्यात आल्या आहेत. या योजनेत कोठेही गोंधळ होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पार्किंगच्या बहुमजली इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.’’

विशेषतः सायंकाळी सहा ते रात्री बारा यादरम्यान विमानांची वाहतूक वाढते. त्या वेळी विमानतळावर वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे आता नवी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

१५० विमानांची रोजची संख्या
सुमारे २००० प्रवाशांची रोजची वाहतूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT