Two more accused arrested for theft in Electric product shop in Kasba Peth 
पुणे

कसबा पेठेतील दुकानातील चोरीच्या प्रकरणी आणखी २ आरोपीना अटक; साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

पांडुरंग सरोदे

पुणे : कसबा पेठेतील इलेक्ट्रिक वस्तु विक्रीच्या दुकानामध्ये चोरी करुन गुजरातमध्ये पळून गेलेल्या आणखी दोन आरोपीना फरासखाना पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्यांनी चोरलेला तब्बल साडे तीन लाख रूपयांच्या इलेक्ट्रिक वायर व अन्य वस्तु पोलिसांनी जप्त केल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

किरणकुमार सरेमलजी शहा (वय ४२, रा. भोसरी) व महावीर नाथालाल जैन (वय ३४, रा. सॅलसबरी पार्क, मार्केटयार्ड दोघेही मुळ रा. पालनपूर, गुजरात) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

कसबा पेठ परिसरातून काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वस्तुच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार घडला होता. तेथून लाखो रूपयांच्या इलेक्ट्रिक वायर व अन्य वस्तु चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने सीसीटिव्ही चित्रीकरणाद्वारे चोरटयाचे वाहन क्रमांक मिळवुन दोन आरोपींना अटक केली होती. तर याच गुन्हयांतील आणखी दोन आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांच्याकडे चोरीचा माल ठेवला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिस बंदोबस्तांत गुंतलेले होते. त्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. दरम्यान त्यातील एक आरोपी हा कात्रज परिसरात राहत असल्याची खबर फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी बापू खूटवड, अमोल सरडे, सयाजी चव्हाण, दिनेश भांदुर्गे, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ, गणेश ढगे, मुयुर भोकरे, मोहन दळवी यांच्या  पथकाने कात्रजमधील बालाजीनगर येथून शुक्रवारी किरणकुमार शहा यास ताब्यात घेतले.  त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर चौथा आरोपी महावीर जैनलाही पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्यांच्याकडुन पकडले चोरीचा ३ लाख ५४ हजारांचा वायरिंगचा माल जप्त केला आहे. तर आत्तापर्यंत साडेचार लाख रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा ; पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी कधीही पुरस्कार विकत घेतले नाही' ट्रोलर्संना अभिषेकचं उत्तर, म्हणाला...'मी मेहनतीनं सन्मान मिळवलाय '

IND vs AUS 2nd T20I Live : W,W,W,W! भारताने १२ धावांच गमावल्या चार विकेट्स, Josh Hazlewoodने केला करेक्ट कार्यक्रम

Aadhaar Card Update : आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; UIDAI ला दिला 'हा' आदेश

Latest Marathi News Live Update : गुजराती मालकाला मनसेचा दणका

राज ठाकरेंना मारण्यासाठी बेस्टची बस हायजॅक केली अन्... ; रोहित आर्या प्रकरणानंतर अनेकांना १७ वर्षांपूर्वाच्या 'त्या' थरारक घटनेची आठवण

SCROLL FOR NEXT