Gram-Panchyat 
पुणे

पुणे जिल्ह्यात आणखी दोन नव्या ग्रामपंचायती

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 409 वर जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या या शिफारशीनुसार जुन्नर तालुक्‍यातील हिवरे बुद्रूक ग्रामपंचायतीचे विभाजन केले जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पुनर्वसित गावठाण असलेल्या कैलासनगरला स्वतंत्र नवी ग्रामपंचायत होणार आहे. याशिवाय खेड तालुक्‍यातील बिबी ग्रामपंचायतीचे विभाजन करून, बुरसेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे.

याआधी मार्च महिन्यात आठ नवीन ग्रामपंचायतींची स्थापना झाली आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या एक हजार 407 झाली होती. त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे येत असतो. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागीय आयुक्तांना याबाबत शिफारस करत असतात. या शिफारशींच्या आधारे विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवत असतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येत असते, असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

Marathi News Live Updates : शिरोलीत मिरवणुकीत होमगार्डला धक्काबुक्की; पोलिस अधिकारी सुनील गायकवाड, शशिकांत खवरे यांच्यात वादावादी

Nila Vikhe Patil : माजी केंद्रीय मंत्र्यांची नात स्वीडनच्या संसदेत खासदार; कोण आहेत नीला विखे पाटील?

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT