coronavirus-test 
पुणे

शिक्रापूर डेंजर झोनमध्ये, आणखी दोघांना कोरोना... 

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे oदोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ठ झाले. ते मुंबईहून शिक्रापुरात आलेले आहे. मुंबईतून आलेल्यांना तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर योग्यरित्या क्वारंटाइन केले जात नाही. त्यामुळे गाव पुन्हा डेंजर झोनमध्ये गेले आहे. 

शिक्रापूर येथे दोन महिन्यांपूर्वी पहिला कोरोनारुग्ण सापडला. त्यानंतर शिक्रापूरला तब्बल ९ कोरोनाबाधितांना सामोरे जावे लागले. आज पुन्हा एकदा आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शिक्रापूर पुन्हा एकदा डेंजर झोनमध्ये गेले आहे. आज सापडलेले दोघेही मुंबईहून शिक्रापुरात आलेले आहे. मुंबईतून आलेल्यांना तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर योग्यरित्या क्वारंटाइन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा मोठा धोका उद्भवण्याची शक्यताही आरोग्य विभागाकडून आज व्यक्त झाली.

शिक्रापुरातील राऊतवाडी परिसरात २४ मार्च रोजी पहिला कोरोनारुग्ण सापडला. आज सापडलेले रुग्ण २० मे रोजी मुंबईहून आलेल्या बाप-लेकांना कोरोना झाल्याचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले. या दोघांसह इतर पाच जणांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यांच्याही अहवालाची प्रतिक्षा आहे. दोन्ही रुग्ण सध्या ससूनमध्ये उपचार घेत असून, दोघांचेही रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. 
      
मुंबईतून मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात अनेक जण रहायला आलेले आहेत. खरे तर प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर या सर्वांना होम क्वारंटाइन करावे, अशा स्पष्ट सुचना प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायती याबाबत गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या पुढे ज्या-ज्या गावात मुंबई- पुण्यातील मंडळी राहायला आलेले आहेत, त्या गावांमध्ये कोरोना संशयित सापडण्याचा धोका आहे. पर्यायाने ग्रामपंचायतींनी सावध पावले उचलून कुठल्याही गावातून आपल्या गावात रहायला आलेल्यांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाइन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे. 

रम्यान, शिरुर तालुक्यात शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, कवठे, म्हसे, मांडवगण आदी गावांमधून साधारण १९ कोरोना संशयित आढळले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीन सतर्क राहण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: हा ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात! बिश्नोई गँगकडून पिंपरीत गोळीबार; FB पोस्टमधून व्यावसायिकाला धमकी

Miraj Transformer Current Accident : मामा -भाचे शेतात औषध फवारणी करताना अचानक ट्रान्सफॉर्मरचा लागला करंट, दोघांचाही जागीच मृत्यू

इंजेक्शन आणायला मुलाला झालेला काही सेकंदाचा उशीर अमजद खान यांच्या जीवावर बेतला ! काय घडलं नेमकं ?

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरकरांवर पाणी संकटाच सावट

Lonavala News: मिसिंग लिंक एक्सप्रेसवे एकत्र येतात तिथं दोन ट्रक अन् कंटेनरचा अपघात; तिघांचा मृत्यू, बोरघाटात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT