Corona Test 
पुणे

भोर शहराचा मजबूत बुरुज अखेर कोरोनाने ढासळवला 

विजय जाधव

भोर (पुणे) : आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या भोर शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून, बुधवारी (ता. १७) दुपारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. यामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी दिली. 

भोर शहरातील नागोबा आळीत राहणारा तरुण हा पुण्यामध्ये कामास आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात तो घरीच होता. तो आता कामावर जाणार होता. त्यासाठी त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तसेच, कोरोनाबाधित आढळलेली महिला भोरमध्येच होती, मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या पुण्यातील हॉस्पिटलमध्ये औषोधोपचारासाठी गेल्या होत्या. त्यांनी पुण्यातच खासगी तपासणी केली. त्याही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. 

भोर तालुक्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण १४ एप्रिलला नेरे गावात आढळला होता. त्यानंतर मे महिन्यात रायरी, मानकरवाडी, वरोडी खुर्द, नसरापूर व वेळू या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र, भोर शहरात आजपर्यंत एकही रुग्ण कोरोनाग्रस्त आढळलेला नव्हता. तालुक्यातील सर्वच्या सर्व कोरोनाग्रस्तांनी ६ जून रोजी आजारावर मात केली होती. मात्र, सोमवारी (ता. १५) वेळू येथील कंपनीतील कामगार कोरोनाग्रस्त सापडला, आणि बुधवारी (ता.१७) भोर शहरात दोघेजण आढळून आले. त्यामुळे भोरवासीयांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. 

भोर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरातील दुकानदारांनी व इतर व्यवसायीकांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडून कंटेन्मेंट आणि बफर झोनचा कार्यक्षेत्र ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. पुढील नियोजनासाठी बुधवारी सायंकाळी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासनाची बैठक सुरु आहे. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT