पुणे

Pune Crime News : गाडीची लाईट का चमकावली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते.

संतोष कानडे

पुणेः गाडीची लाईट चमकावल्याच्या किरकोळ कारणाववरुन २० जणांनी मिळून दोघांना मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये मारहाणीची घटना घडली आहे. महमदवाडी येथे दोन तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मागच्या वर्षभरापासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. कोयता गँगने अनेक दिवस दहशत माजवल्यानंतर अशा गुंडगिरीच्या घटना सातत्याने पुण्यात घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी; आज पहिला दौरा

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT