drown 
पुणे

मुळशी धरणात बुडून दोघांचा मृत्यू 

मकरंद ढमाले

माले (पुणे) : मुळशी धरण परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोमवारी बुडून दोघांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह मंगळवारी सापडले.

वळणे येथील घटनेत किशोर अनंता फाटक (वय ४२, रा. शिरवली, ता. मुळशी) याचा, तर ढोकळवाडी येथे अरुणाचल प्रज बिहारी (वय २०, रा. उत्‍तर प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. 

किशोर व त्‍याचे मित्र सोमवारी वळणे येथे, तर अरुणाचल व त्‍याचे मित्र ढोकळवाडी येथे मुळशी धरणाच्‍या पाण्‍याजवळ फिरण्‍यास गेले होते. यावेळी ते पाण्‍यात बुडाले. या दोन्‍ही घटनांमध्‍ये परिसरात दारुच्‍या बाटल्‍या आढळल्‍या आहेत. त्‍यामुळे दारू पिऊन पोहण्‍याच्‍या प्रयत्‍नात ते बुडाले असल्‍याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सोमवारी अंधार व पाऊस असल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले. मंगळवारी सकाळी पुन्‍हा शोध घेण्‍यात आला. दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास किशोर याचा मृतदेह आढळून आला. तर तीन वाजता अरुणाचल याचा मृतदेह सापडला. 

पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, हवालदार मंगेश लांडगे, मुळशी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीचे कार्यकर्ते व अग्नीशमन दलाच्‍या जवान, स्‍थानिक युवक यांनी शोध कार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT