Crime-Scene
Crime-Scene 
पुणे

लाच स्वीकारताना दोन पोलिसांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अपघाताच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ही कारवाई केली.

पोलिस हवालदार नीलकंठ रघुनाथ शेजाळे (वय ४५), पोलिस नाईक बप्पा भिकाजी गायकवाड (वय ४१) अशी अटक केलेल्या संशयित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्याकडून अपघाताचा गुन्हा घडला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्याबाबत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.

त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करणे बंधनकारक होते. मात्र, शेजाळे व गायकवाड यांनी तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. या प्रकाराबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार, सोमवारी त्यांना आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. पोलिस निरीक्षक अलका सरग व गिरीश सोनवणे यांच्या पथकाने दोघांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT