The two thieves have been arrested by the Hadapsar police investigation team 
पुणे

सराईत चोरट्यांना अटक; 29 लाखाचा मुद्देमाल जप्त, घरफोडीचे सात तर पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस

सनिल गाडेकर

पुणे : हडपसर, लोणीकाळभोर, शिवाजीनगर, लोणीकंद आणि दत्तवाडी परिसरात चोरी करणा-या दोघा सराईत चोरट्यांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. सनिसिंग पापासिंग दुधानी (वय 19) आणि सोहेल जावेद शेख (वय19 दोघेही रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. तर एका विधीसंघर्षीत मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून सात घरफोडीचे व पाच वाहन चोरीचे असे तब्बल १२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून 25 ग्राम सोने, तीन किलो चांदी आणि पाच चारचाकी असा एकूण 29 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गस्तीवर असताना पोलिस नाईक विनोद शिवले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, फुरसुंगी गाव येथील महादेव ज्वेलर्स हे दुकान फोडून चांदी चोरी करणारे आरोपी हे म्हाडा कॉलनी मंत्री निवास येथे येणार आहेत. त्यानुसार पथकाने साध्या वेशात सापळा लावला होता. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. दरम्यान पोलिसांनी पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हडपसर, लोणीकाळभोर, शिवाजीनगर, लोणीकंद, दत्तवाडी येथील परिसरात चोऱ्या केल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT