sasoon hospital
sasoon hospital 
पुणे

ससून रुग्णालयात वर्षभरात दोन हजार दहा अर्भकांना जीवदान

योगिराज प्रभुणे

पुणे - जगात येताच पहिल्या श्‍वास घेत नाही तोच मृत्यूशी झुंज द्याव्या लागणाऱ्या नवजात अर्भकांसाठी ससून रुग्णालय देवदूत ठरतंय. जेमतेम 700 ते 800 ग्रॅमच्या, वितभर बाळाच्या प्रत्येक श्‍वासात प्राण फुंकण्यासाठी रात्रं-दिवस झटणाऱ्या रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्समुळे वर्षभरात दाखल झालेल्या दोन हजार 200 नवजात अर्भकांपैकी 2 हजार 10 अर्भकांना जीवदान मिळालंय. ते ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले. हे प्रमाण तब्बल 91 टक्के आहे. 

काही वेळा नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच प्रसूती होते. "प्रिमॅच्युअर बेबी'चा जन्म होतो. मगं नव्यानंच आई-बाबा झालेल्यांची अक्षरशः ओढाताण होते. आपल्या हाड-मासांच्या त्या गोळ्याला काचेच्या पेटीत ठेवलं जातं. त्याच्या कोवळ्या नाकात नळ्या घातल्या जातात. हे सगळं बघत असतानाच खर्चाचा मोठा भार पेलावा लागतो. खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या या उपचारात किती दिवस लागतील हे सांगता येत नाही, उपचारांना कसा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाजही नसतो. पण, खर्च मात्र रोजच्या रोज करावा लागतो. अशा अवस्थेतून जाणाऱ्या 60 टक्के आई-बाबांवर अशी वेळ येते, की खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्या वेळी खासगी रुग्णालयातून त्या पोटच्या गोळ्याला ससून रुग्णालयाच्या नवजात अर्भक विभागात दाखल केले जाते. हा त्यांच्या आशेचा शेवटचा किरण असतो. पण, या रुग्णालयातून हे बाळ बरे होते. ते आपल्या आईच्या कुशीत विसावते. ते खडखडीत बरे होते. 

बालरोग तज्ज्ञ विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. छाया वळवी म्हणाल्या, ""इतर रुग्णालयांत प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भकाला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जाते. यातील बहुतांश अर्भके ही अत्यवस्थ असतात. त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत गुंतागुंतीचे असते. त्यामुळे या अर्भकांना जीवदान देणे हे मोठे आव्हान येथील डॉक्‍टरांपुढे असते.'' 

नवजात अर्भक विभागाची वैशिष्ट्ये  
- अद्ययवात वैद्यकीय उपकरणे 
- नवजात अर्भकतज्ज्ञ 
- प्रशिक्षित नर्स 
- सक्षम पायाभूत सुविधा 

ससून रुग्णालयातील नवजात अर्भक विभाग गेल्या वर्षांपूर्वी नव्याने तयार करण्यात आला. अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्‍टर आणि प्रशिक्षित नर्स यांच्या माध्यमातून अर्भकांचे प्राण वाचविण्यात यश मिळत आहे. हा विभाग सुरू करण्यासाठी मुकुल-माधव फाउंडेशन आणि श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या रुग्णसेवाचा दर्जा उंचावला आहे. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

MI vs LSG Live Score IPL 2024 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला हादरे; रोहितही झाला बाद

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

Lok Sabha Election 2024 : धुळ्यात भाजपचा गड कोसळणार? जाणून घ्या कसं असेल विजयाचं गणित

Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT