Two-wheeler rally of criminal on release from jail with accomplices from yerwada to loni kalbhor 
पुणे

जामिनावर तुरुगांतून बाहेर पडताच अट्टल गुन्हेगारांची साथीदारांसह पुण्यात दुचाकी रॅली

सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : जामिनावर तुरुगांतून बाहेर पडताच अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी येरवडा ते लोणी काळभोर दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढली. तुरुगांतून बाहेर पडलेल्या गुन्हेगारांचे जंगी स्वागत केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारख्या गंभीर गुन्हातील हे अट्टल गुन्हेगार आहेत.

रॅली काढुन स्वागत झालेल्या गुन्हेगारांचे शुभम कैलास कामठे (वय 26, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) नाव असुन, शुभम कामठे याच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शुभम कामठे याच्यासह ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्मी (रा. सर्व कदमवाकवस्ती, ता.हवेली) व पाच अनोळखी अशा अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार रोहिदास पारखे यांनी तक्रार दिली आहे. 

'चला मावळे घेऊन येऊ'; किल्ल्यांच्या चित्र खरेदीसाठी बालगोपाळात रमले खासदार!

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील अट्टल गुन्हेगार, शुभम कामठे हा खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा विविध गुन्हात मागिल अडीच वर्षापासुन येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. शुभम कामंठे यास न्यायालयाने जामिन दिल्याने, शुक्रवारी (ता. १३) दुपारी त्याची सुटका झाली. सुटका होऊन कारागृहाबाहेर पडताच, ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्मी व त्याच्या कांही साथीदारांनी येरवडा कारागृह ते लोणी काळभोर या दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढुन कामठेला घरी आनले. कामठे याच्या साथीदारांनी वरील रॅलीचा एक व्हिडीओ ही सोशल मिडीयावरुन व्हायरल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत शुभम कामठे जिंदाबाद, आला रे आला बाप आला अशा मोठ-मोठ्याने घोषणा देत, कामठे याचे साथीदार रस्त्यात दहशत निर्माण करत असल्याचेही दिसुन आलेले आहे. दरम्यान व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच, लोणी काळभोर पोलिसांनी कामठे यास अटक करुन, गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माज मोडणार- पोलिस निरीक्षक सुरज बंडगर
याबाबत बोलतांना लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, शुभम कामठे याच्या स्वागताचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला असुन, या प्रकरणी शुभम कामठे व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुभम कामठे व त्याच्या वरील साथिदारांच्या विरोधात यापुर्वीही लोणी काळभोर व हडपसर पोलिसात  खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे शुभम कामठे व त्याच्या साथिदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक कार्यालयाकडुन मिळालेल्या आहेत. यापुढील काळात नखऱे करणाऱ्या गुन्हेगारांचा माज मोडेल अशाच पध्दतीने कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आहेत. याही प्रकरणात शुभम कामठे व त्याच्यासाथीदारांचा माज मोडेल अशीच कारवाई केली जाणार आहे. 
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT