पुणे

Pune Crime: सराईत दुचाकी चोरटा अशोक सोनवणेला पोलिसांनी केली अटक

मोठया किमतीच्या दुचाकी विकत घेता, परंतु दोन ते तीन हजार रुपये किमतीचे जीपीएस लावत नाही. वाहनांना जीपीएस लावावे. दुचाकी पार्किंग करताना त्या सीसीटीव्हीच्या कक्षेत पार्किंग कराव्यात. दुचाकी रस्त्यावर कोठेही बेवारस रित्या सोडून जाऊ नये.जास्त काळ ठेवून निघून जाऊ नये

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime: चाकण पोलिसांच्या वाहनचोरी विशेष तपास पथकाकडून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीची चोरी करणारा सराईत दुचाकी चोरटा आरोपी अशोक मधुकर सोनवणे (वय -40 वर्ष ,रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. नगर )याला अटक केली आहे.

या आरोपीकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या चोरी केलेल्या बारा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चाकण परिसर हा औद्योगिक वसाहतीचा असल्याने तसेच वाढती रहदारी असल्याने काही व्यक्तीकडून दुचाकीची चोरी होत असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी दुचाकी चोरी बाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना सूचना दिल्या होत्या

. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,विक्रम गायकवाड,सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार हनुमंत कांबळे, पोलीस नाईक निखिल शेटे, पोलीस शिपाई संदीप गंगावणे, महेश कोळी यांचे पथक तयार करून रेकॉर्डवरील सराईत आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला. आरोपी सोनवणे याचा शिक्रापूर, शिरूर, राळेगण थेरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आरोपीचा मागमूस काढत सलग सात दिवस शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण बारा दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,पोलीस निरीक्षक (गुन्हे )युनुस मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड, गायकवाड, सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, निखिल शेटे,नितीन गुंजाळ,सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतीक चव्हाण,महिला पोलीस शिपाई माधुरी कचाटे यांनी केली आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार संतोष सुपेकर करत आहेत.दुचाकी चोरीचे तांत्रिक विश्लेषण केले व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी सोनवणे याला अनेक पत्नी असून वेगवेगळी नावे तो सांगून अहमदनगर,नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पोलिसापासून आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी तो राहत होता. राहण्याच्या ठिकाणाची निश्चित माहिती पोलिसांना मिळत नव्हती.

मोठया किमतीच्या दुचाकी विकत घेता, परंतु दोन ते तीन हजार रुपये किमतीचे जीपीएस लावत नाही. वाहनांना जीपीएस लावावे. दुचाकी पार्किंग करताना त्या सीसीटीव्हीच्या कक्षेत पार्किंग कराव्यात. दुचाकी रस्त्यावर कोठेही बेवारस रित्या सोडून जाऊ नये.जास्त काळ ठेवून निघून जाऊ नये. पार्किंग करताना दुचाकीच्या डिकीला तसेच दुचाकीला चावी सोडून जाऊ नये त्याची तपासणी करावी. असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT