Accident 
पुणे

बाणेर : रस्त्याकडेच्या खड्ड्यात टू-व्हीलर गेली अन् दोघांनी गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील डी मार्टजवळ दुचाकी अपघातात म्हाळुंगे येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (ता.8) मध्यरात्री दीडच्या दरम्यान झाला. सध्या स्मार्ट सिटीकडून बाणेर रस्ता येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथाच्या विकसनाचे काम सुरू आहे, त्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केलेल्या साडेतीन ते चार फूट खड्ड्यामध्ये या मुलांची दुचाकी जाऊन अपघात झाला. अपघातांमध्ये ही दोन्ही मुले जागीच ठार झाली.                          

बाणेर येथील सदानंद चौकाजवळील डी मार्ट आणि वेस्टसाइड या शॉपिंग मॉलजवळ रविवारी (ता.8) पहाटे दीडच्या दरम्यान कावासाकी स्पोर्ट बाईक अपघातांमध्ये तेजस शर्मा (वय 26, मूळगाव जयपूर) आणि देवाशिष सक्सेना (वय 24, मूळगाव भोपाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही सध्या म्हाळुंगे येथील एका सोसायटीमध्ये राहत होते. साधारण दीड वर्षांपासून हे दोघेही कामानिमित्त पुण्यात राहत होते. बाणेर रस्ता येथे स्मार्ट सिटीकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ  विकसनाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूला रस्ता खोदला आहे. पहाटे दीडच्या दरम्यान हे दोघे पुणे विद्यापीठकडून मुंबई-बेंगलोर महामार्गाकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी त्यांची दुचाकी साडेतीन ते चार फूट खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.

या अपघाताची माहिती रात्रपाळीला असणाऱ्या पोलिस मार्शलकडून मिळताच, चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे आणि त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना औंध रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून ही दोन्ही मुले मृत झाल्याचे घोषित केले. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही. पुढील तपास चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन ते सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT