पुणे

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात वाहने चोरीचे प्रकार वाढले

युनूस तांबोळी

टाकळी हाजी ः शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात दुचाकी व चारचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. कवठे येमाई (ता. शिरूर) ढाकीवस्ती येथे (ता. 23 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब पंढरीनाथ सांडभोर यांच्या घरासमोरून एमएच 12 जेइ 5070 या क्रमांकाची चारचाकी पिकअप चोरट्यानी लंपास केली. याबाबत टाकळी हाजी पोलिस चौकीस 24 फेब्रुवारीला तक्रार दिली आहे. या चोरीचा तपास लागला नाही.

सध्या चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे, याबाबत वाहनांच्या चोऱ्यांना आळा बसावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जांबूत (ता. शिरूर) येथे शनिवर (ता. 6) बाळासाहेब पठारे यांच्या रहात्या घराजवळून पहाटेच्या सुमारास एमएच 12 एसटी 8231 या क्रमांकाची बुलेट गाडी चोरून नेली. त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी वापरलेली श्रीरामपूर येथून आणलेली एमएच17 बीजे 5327 या क्रमांकाची हिरो कंपनीची ही दुचाकी चोरटे सोडून पसार झाले. ही दुचाकी टाकळी हाजी पोलिस चौकीस जमा करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी येथे या बाबत तक्रार देण्यात आली आहे. मात्र पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असून गुन्हा नोंदविला नसल्याचे जालिंदर पठारे यांनी सांगितले. तसेच जांबूत येथून बबन जगताप यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT