uday samant on shivsena party workers attack on convey in pune  sakal
पुणे

पुण्यात गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना आज (मंगळवारी) पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला, या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी त्यावेळी नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे. सामंत म्हणाले की, माझा ताफा कोणी आडवला नाही, गाडी सिग्नलला थांबलेली होती, तेव्हा काही गाड्यामध्ये मुलं बेसबॉलच्या स्टीक आणि आणि दगड घेऊन आले. त्यांनी गाड्यांवर हात मारायला, मला शिवीगाळ करायला सुरुवात केली, हल्लेखोर पोलिसांच्या अंगावर आल्याचे सामंत म्हणाले.

पुढे बोलताना सामंत यांनी सांगितले की, त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर ते गाडीच्या मागच्या बाजूने केले आणि त्यांनी बेसबॉल स्टीकने गाडी फोडली, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सिग्नल सुरु झाल्यानंतर मी गाडी घेऊन पळालो. पण त्यांचा हेतू वाईट होता. मला असं वाटत नाही की त्यांना कुणी पाठवलं होत, पण याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. अशी राजकारणातील प्रवृत्ती वाढत असेल तर ती ठेचून टाकली पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले आहेत.

हा हल्ला झाल्याने मी घाबरून जाणार नाही, हा नियोजित हल्ला होता, पण मला कोणाला दोष द्यायचा नाही, माझा पोलिसांवर पुर्ण विश्वास आहे , त्यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. याच्यातले काही कॉलेजचे विद्यार्थी असतील तर कारवाई देखील करु नये, कोणाचं करिअर बाद होऊ नये, पण कोणाच्या सांगण्यावरून हे झालं असेल तर तीथपर्यंत पोलिसांनी पोहचावं असे उदय सामंत यावेळी म्हणाले आहेत. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फोन करुन माझी विचारपूस केली आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT