ugram rifle sakal
पुणे

Ugram Rifle : एआरडीईची निर्मित उग्रम पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल

देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ‘उग्रम’ आता पूर्णतः तयार झाली असून, काही अंतिम चाचण्यांनंतर ती संरक्षण दलांना उपलब्ध होणार आहे.

सम्राट कदम

पुणे - देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ‘उग्रम’ आता पूर्णतः तयार झाली असून, काही अंतिम चाचण्यांनंतर ती संरक्षण दलांना उपलब्ध होणार आहे. पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने (एआरडीई) ही रायफल विकसित केली आहे. विशेष म्हणजे १०० दिवसांच्या विक्रमी वेळेत उग्रमची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योगांच्या भागिदारीने एआरडीईने केलेली ही कामगिरी खऱ्या अर्थाने ‘मिशन मोड’ ठरली आहे.

पाषाण रस्त्यावरील एआरडीईच्या संकुलात शस्त्रास्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणालीचे (एसीई) महासंचालक डॉ. शैलेंद्र गाडे आणि एआरडीईचे संचालक ए.राजू यांच्या उपस्थितीत ‘उग्रम’चे अनावरण करण्यात आले. एआरडीईकडून होणाऱ्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून, पुढील एक दोन आठवड्यात संरक्षण दलाच्या मानकांनूसार चाचण्या घेतल्या जातील असे ए.राजू यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘खासगी उद्योगांच्या भागीदारीने १०० दिवसांच्या विक्रमी वेळेत उग्रमची निर्मिती केली आहे. गोळ्यांच्या फेऱ्यांची क्षमता, अचूकता, होणारा विध्वंस आणि सर्व स्तरातील वातावरणातील तिची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे.’ भारतीय सैन्याच्या साहाय्याने पुढील दोन ते तीन महिने रायफलची चाचणी घेण्यात येणार आहे. सोमवारी कार्यक्रमानंतर एआरडीईच्या मैदानात उग्रमची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. द्विपा आर्मर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा उग्रमच्या निर्मितीत सहभाग आहे.

मोठी मागणी -

रशिया-युक्रेन आणि इस्राईल-हमास युद्धामुळे रायफल उत्पादक कंपन्यांकडील मागणी वाढली आहे. अशा स्थितीत अनेक देशांना रायफलींचा पुरवठा पाहिजे तसा होत नाही. त्यामुळे भारताच्या स्वदेशी असॉल्ट रायफलला देशासह परदेशातही मागणी आहे. एकदा का उग्रम संरक्षण दलांच्या मानकांवर खरी उतरली तर निश्चितच देशातील संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना एक दिशा मिळेल, असे मत द्विपाचे संचालक जी. राम चैतन्य रेड्डी यांनी व्यक्त केले.

उग्रमची वैशिष्ट्ये -

- प्रकार - ७.६२ बाय ५१ मिलीमीटरची असॉल्ट रायफल

- मारक क्षमता - ५०० मीटर

- वजन - ४ किलोग्रॅम पेक्षा कमी

- चालवण्याची पद्धत - स्वयंचलित

- मॅगझीन - २० गोळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: पोलिस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लुटले

SCROLL FOR NEXT