पुणे

सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी गेटजवळ अनधिकृत पार्किंग; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ रात्रंदिवस अनधिकृतपणे  वाहने उभी करुन ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या या वाहनांकडे सिंहगड रस्ता वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

नांदेड सिटी गेटजवळ नांदेड फाट्याच्या बाजूस खाजगी बस, टेंपो,ट्रक, कंटेनर,क्रेन व इतर लहान-मोठी वाहने अनेक दिवसांपासून उभी केली जात आहेत. याच ठिकाणापासून सिंहगड रस्त्यावरील दुभाजकाची सुरुवात झालेली असल्याने रस्ता अरुंद आहे.त्यामुळे या अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांचा पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. अरुंद रस्त्यामुळे वाहने दुभाजकावर आदळल्याने या ठिकाणी अनेक अपघातही झालेले आहेत.

वाहने उभी असल्याने त्यांच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने या ठिकाणी दुर्गंधीचेही साम्राज्य पसरलेले आहे.तसेच हा मद्दपींचाही अड्डा बनलेला आहे.दारुच्या रिकाम्या बाटल्या आजूबाजूला पडलेल्या असतात.रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेऊन एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या वाहन मालकांवर वेळीच कारवाई करणे आवश्यक बनले आहे.

या उभ्या असलेल्या वाहनांमुळे सतत वाहतूक कोंडी होत असते.या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलाही थांबत आहेत.वाहतुक पोलीसांनी या अनधिकृतपणे पार्कींग करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करुन रस्त्यावरील अडचण दूर केल्यास त्यामुळे इतर अनेक समस्या आपोआप सुटतील.-चंद्रकांत थोरे, विश्वस्त, परिवर्तन सामाजिक संस्था.

येथील काही वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.इतरही वाहणांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.बेवारसपणे उभ्या असलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. -नंदकिशोर शेळके, पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक शाखा.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT