Summer-Camp 
पुणे

उन्हाळी क्रीडा शिबिरे, स्पर्धांवरही अनिश्चिततेचे सावट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा प्रशिक्षण यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे, यंदाचा उन्हाळी हंगामालाच पूर्णपणे 'टाळेबंदी' लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

शहरातील शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्ट्या सुरु होतात. या सुट्ट्यांमध्ये जलतरण, क्रिकेट,हॉकी यासारखी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे भरविली जातात. शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभत असतो.गेल्या महिनाभरापासून राज्यात टाळेबंदी लागू असल्याने बहुतेक शाळा-महाविद्यालये यांचे चालू शैक्षणिक वर्ष परीक्षांविना सरले आहे. देशातील टाळेबंदीची मुदत ३ मे पर्यंत आहे. त्यानंतर, पुढील निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मात्र, टाळेबंदी हटविली तरी उन्हाळी हंगामात क्रीडा शिबिरे, स्पर्धा यांच्यावरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता क्रीडा क्षेत्रामधून वर्तविली जात आहे.

"दरवर्षी उन्हाळी हंगामात खासगी आणि महापालिकेच्या तलावांवर जलतरण प्रशिक्षण शिबिरे भरविली जात असतात. मात्र, टाळेबंदी मुळे सर्व तलाव महिनाभर बंद आहेत. पुढील मे महिन्यात टाळेबंदी हटविली तरी शिबिरे आणि निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही'
- के.ए.कांबळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड जलतरण संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: शाळा सुटताच विद्यार्थिनीचं अपहरण, दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, हात-पाय, तोंड बांधून...; १३ वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

IND vs SLC XI Warm UP : यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला, शुभमन गिल फलंदाजीला का नाही आला? कसोटी मालिका मुकणार?

Flamingo Birds at Bamnoli : बामणोलीत निसर्गाची जादू! हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर अन् गुलाबी फ्लेमिंगोंचे थवे; त्रिवेणी संगमावर परदेशी पाहुण्यांचे आगमन

Latest Marathi News Live Update : अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरु

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

SCROLL FOR NEXT