Sim-Swapping 
पुणे

सीमकार्ड अपडेट करून देतो म्हणाला अन् ११ लाखांना गंडा घातला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सीमकार्ड अद्ययावत करण्याचा बहाणा करुन अनोळखी व्यक्तीने एका नागरिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि त्यांच्या खात्यातील 11 लाख रुपये ऑनलाइन माध्यमाद्वारे काढले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ५७ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे लष्कर परिसरात राहतात. दोन महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. आपण मोबाइल कंपनीतून बोलत असल्याचे सांगत तुमचे सीमकार्ड अद्यायावत करायचे आहे, असे अशी बतावणी करीत त्याने फिर्यादीचा विश्वास प्राप्त केला.

त्यानंतर त्याने फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविला, तोच मेसेज फिर्यादी यांना 12354 या क्रमांकावर पाठविण्यास सांगितला. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या मोबाइलमधील बैंकेसंबंधीची गोपनीय माहिती चोरली. फिर्यादीचा संबंधीत मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडला असल्याने त्यांनी मेसेज पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून ११ लाख १७ हजार ५२८ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत तपास करत आहेत. दरम्यान,कोथरूड येथे राहणाऱ्या नागरीकाला देखील दोन महिन्यांपूर्वी याच पद्धतीने बतावणी करुन अनोळखी व्यक्तीने तब्बल १८ लाख रुपयांना गंडा घातला होता. 

सीमकार्ड अद्यायावत करण्याचा बहाणा करुन अनोळखी व्यक्ती नागरीकांच्या मोबाइल क्रमांकावर एक २० अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला मेसेज पाठवितो. हाच मेसेज तो नागरीकांना पुन्हा १२३५४ या क्रमांकावर पाठविण्यास सांगतो. तो मेसेज पाठविताच नागरीकाच्या मोबाईलमधील सीमकार्ड बंद पडते. तो मोबाईल क्रमांक आपोआप अनोळखी व्यक्तीच्या सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बँकेच्या मेसेजचा गैरवापर करून अनोळखी व्यक्ती संबंधीत नागरीकाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेते. अशा तक्रारीमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा फोन/मेसेजला प्रतिसाद देऊ नका
- बँक, मोबाइल,विमा कंपनीकडून बोलत आहे
- मोबाइल/बँक खाते/ पेटीएम अद्ययवत करायचे आहे
- आम्ही पाठविलेला मेसेज 12354 या क्रमांकावर पाठवा
- मोबाईलमध्ये बँक खात्याशी संबंधित किंवा गोपनीय माहिती ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT