दरड sakal
पुणे

बिबवेवाडी दरडी कोसळण्याच्या छायेखाली

नागरिकांना, घरांना दरड कोसळन्याच्या सावटाखाली रहावे लागत आहे.

नितीन बिबवे

बिबवेवाडी : शहराच्या इतिहासात दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज च्या निसर्गरम्य टेकड्या अतिरिक्त भरावामुळे टेकड्यांवर कृत्रिम टेकड्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे त्याखाली असलेल्या नागरिकांना, घरांना दरड कोसळन्याच्या सावटाखाली रहावे लागत असून काही ठिकाणी दरड, दगडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत परंतु प्रशास्नानाला कधी जाग येणार आहे का मोठी दुर्घटना घडल्यावर जाग येणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune News)

शहराच्या जुन्या व नवीन विकास आराखड्यानुसार टेकड्या लगतचा व भौगोलिक दृष्ट्या समान असलेला भाग रहिवासी आहे आहे त्यानुसार मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत परंतु गृहप्रकल्प सुरू करताना त्यातून निघणारे गौण खनिज, मुरूम टाकण्यासाठी संबंधितांनी वेवस्था केली पाहिजे परंतु सध्यस्थिती पाहता गृहप्रकल्प शेजारी असलेल्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात मुरूम, गौण खनिज टाकून कृत्रिम टेकडी तयार केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर कृत्रिम टेकडीचा भाग वाहून येऊन घरांवर पडून मोठा अपघात घडू शकतो, याबाबत प्रशासन काही उपाययोजना करणार आहे का मोठी दुर्घटना घडल्यावर विचार करणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहराच्या जुन्या विकास आराखड्यात टेकड्या लगतचा भाग निवासी असल्याने टेकड्या कोरून गृहप्रकल्प उभे राहिले आहे त्यामुळे टेकड्या पोखरून तयार केलेल्या भागात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहे. टेकडी शेजारील जुन्या सोसायट्या मेघस्पर्श सोसायटी, गुंफण अपार्टमेंट, सुपार्श्वनाथ सोसायटी परिसर, झाला कॉम्प्लेक्स, आंनद नगर, गंगा धाम परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर, इमारती वर दरडी पडण्याचे प्रकार घडतात, नागरिक प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करतात परंतु केवळ पाहणी करून पुढे काही उपाययोजना केल्या जात नाही, आता नव्याने कृत्रिमरीत्या तयार केलेल्या टेकडीमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे याबाबत प्रशासन काही तरी हालचाल करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बिबवेवाडीतील टेकडीची मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत पहाणी करून त्यांच्या अभिप्राया नुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

-राधिका बारटक्के, नायब तहसीलदार, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT