Onjal 
पुणे

बारावीतील मराठी विषय ‘ॲप’द्वारे घ्या समजून

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग आणि या काळात ऑनलाइन वर्गांना मिळणारे प्राधान्य लक्षात घेऊन बारावीतील मराठी विषय समजावून देण्यासाठी सहा शिक्षकांनी ‘ओंजळ’ हे नवे ॲप विकसित केले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे ॲप विनामूल्य उपलब्ध केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘शाळा नव्हे, तर शिक्षण सुरू,’ हे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. 

विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन बारावी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओंजळ’ हे ॲप तयार केले आहे. याची निर्मिती बारावी मराठी भाषा पाठ्यपुस्तक अभ्यासगटातील सदस्य डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद, सुचेता नलावडे, रेणू तारे आणि आरती देशपांडे यांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे.

ठळक वैशिष्ट्ये...

  • पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर विवेचन.
  • पीपीटी, कृती आणि व्हिडिओ दिसणार.
  • त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे काही व्हिडिओ.
  • पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक यांची टिपणे.
  • एखाद्या पाठाचा विचार कसा करावा आणि तो स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा, हे यातून समजेल.

असे डाऊनलोड करा ॲप
 गुगल प्ले स्टोअरवर ‘ओंजळ’ हा शब्द लिहा आणि ॲप शोधा
आवश्‍यक लिंक ः https://play.google.com/store/apps/details?id=com.online.book.hscmarathi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Explainer: वर्षभर सोनं खरेदी करू नका असं मोदी का म्हणाले? धक्कादायक कारण समोर

Buldhana लग्नानंतरही लेकीचे चुलतभावाशी प्रेमसंबंध, वडील अन् भावानेचे क्रूरपणे संपवलं; हत्येनंतर मृतदेह एक दिवस ठेवला घरात

IPL 2026: रोहित शर्माची दुखापत ते बुमराह - बोल्टचं अपयश... Mumbai Indians प्लेऑफमधून बाहेर पडण्याची ५ महत्त्वाची कारणं काय?

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक जन्मजात असतात खूप भाग्यशाली, ज्यांच्या आयुष्यात जातात त्यांचा गोल्डन टाइम होतो सुरू

Mumbai News: पुनर्विकास याचिकेत नव्या विकसकाला नकार, घाटकोपरमधील भाडेकरूंना ठोठावला पाच लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT