mahaswayam 
पुणे

शिपायापासून अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या: बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगारीची संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे- इयत्ता नववीपासून बी.ई. इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु बेरोजगार आहात... अशा तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी खासगी कंपन्या पुढे आल्या आहेत. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी सुरू राहील. 

जिल्ह्यातील विविध कंपन्यांना त्यांच्याकडील नववी उत्तीर्णपासून पुढे दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मेकॅनिक, प्रॉडक्‍शन या शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदासाठी नोंदणी करता येईल. हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगइनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगइन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्‍लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील पंडित दिनदयाल उपाध्याय-4 या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची माहिती घेऊन पात्रतेनुसार पदाची निवड करून ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवावा. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच, ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. बेरोजगार युवक युवतींनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT