Suicide
Suicide 
पुणे

बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला धरणात आढळला मृतदेह

निलेश बोरुडे

किरकटवाडी - वाढते वय व बेरोजगारीच्या नैराश्यातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह खडकवासला धरणावरील कर्मचाऱ्यांना पाण्यावर तरंगताना आढळून आला. हवेली पोलिस व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी खडकवासला धरणातून मृतदेह बाहेर काढला.

संजय मारुती नाईक (वय 27 वर्षे,रा. कोंढवे धावडे, मूळ राहणार नागपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मोठा भाऊ नरेंद्र नाईक याने दिलेल्या माहितीनुसार तो बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यातून सोमवार दि.25 जानेवारी रोजी घरातून निघून गेला होता. नरेंद्र नाईक याने दोन दिवस शोधाशोध केल्यानंतरही संजयचा शोध लागत नसल्याने उत्तम नगर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दि. 28 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास खडकवासला धरण शाखेतील स्थापत्य अभियांत्रिकी दत्तात्रय कापसे, कर्मचारी वसंत ठाकर, सागर कडू व विष्णू धोंडगे यांना धरणाच्या भिंतीजवळ मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.त्यांनी याबाबत तातडीने हवेली पोलिस ठाण्याला माहिती दिली. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल मल्हारी राऊत यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली.

पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर सुजित पाटील, ओंकार इंगवले, प्रसाद जिवडे व विशाल घोडे यांनी धरणातून मृतदेह बाहेर काढला. यावेळी खडकवासला धरणाजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेले होमगार्ड प्रवीण घुले, शांताराम राठोड , सत्यम काळे व निखिल पोमन यांनीहीही मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून उत्तम नगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT