An unidentified person mixed urea fertilizer on onion 
पुणे

अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान!

डी.के वळसे-पाटील

मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

 गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT