Stamp Duty 
पुणे

इक्विटेबल व सिंपल मॉर्गेजवर आता एकसमान स्टॅम्प ड्यूटी; राज्य सरकारने दिली मान्यता

सकाळवृत्तसेवा

पुणे - इक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्यूटी आता एकसारखी आकरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकाराच्या गहाणखतासाठी आता 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी ईक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.5 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टर कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तसेच सिंपल मॉर्गेजसाठी पाच लाख रूपयांच्या आत कर्ज असेल, त्यावर 0.1 टक्के आणि त्यावरील रकमेचे कर्ज असेल, तर त्यावर 0.5 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती. सिंपल मार्गेज करणारा घटक हा प्रमुख्याने असंघटीत क्षेत्रातील असे. त्यामुळे त्यांना जादा स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती. त्यामध्ये आता दोन टक्‍क्‍यांनी बचत होणार आहे. 

दरवर्षी अशा प्रकारचे सुमारे पाच ते सहा लाख गहाणखताचे व्यवहार होतात. या दोन्ही मॉर्गेजमधील गोंधळ दूर करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे व त्यांचे शुल्क एकसमान करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे, त्यासाठी स्टॅम्प ऍक्‍टमध्ये दुरुस्ती करून या दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्कच आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यास राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे नागरीकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षी झालेले इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेजची संख्या व त्यातून मिळालेले उत्पन्न पुढील प्रमाणे - 
इक्विटेबल मॉर्गेजची 2 लाख 88 हजार 
-मिळालेले उत्पन्न 383 कोटी रुपये (0.2 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क) 
सिंपल मॉर्गेजची 3 लाख 65 हजार 
- मिळालेले उत्पन्न 1 हजार 807 कोटी रुपये (0.5 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क )

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT