Amit Shah Team eSakal
पुणे

"डॉ. आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

सुधीर काकडे

केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पुण्यामध्ये (Pune) गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मारकाचं भुमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तयार करण्यात मोठं योगदान होतं. वेगवेगळ्या वादग्रस्त मुद्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम आंबेडकरांनी केलं. देशातील दलित, अदिवासींना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. सर्व समाजाला सोबत ठेवून देशाचा विकास करण्यासाठी संविधान तयार कऱण्यात आलं असं म्हणत आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं मत अमित शहांनी यावेळी व्यक्त केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही. त्यांना भारतरत्न देण्याचं काम बिगर काँग्रेसी सरकारने केलं. आंबेडकर यांच्याशी संबंधी पाच जागांना स्मृती स्थळ बनवण्याचं काम बिगर काँग्रेसी सरकारांनी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हाही निवडणूक लढले तेव्हा त्यांना संसदेत येवू न देण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले आणि आज तेच त्यांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला.

ज्या काळात स्वराज्य हा शब्द बोलणं देखील कठीण होतं, त्याकाळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्वराज्य निर्माण झालं असं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. देशभक्तीसाठी युवकांना प्राणांचं बलिदान देण्यासाठी प्रेरीत केलं. आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून प्रशासनांचं एक चांगलं उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलं. सैन्याचं आधुनिकीकऱण करणे, सर्वात आधी नौदल बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं त्यामुळे छत्रपती शिवजी महाराजांचा हा पुतळा सर्वांना प्रेरणा देणारा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT