Union Minister for Manpower Development said that they will consider reducing the CBSE syllabus 
पुणे

तुम्हाला येत्या शैक्षणिक वर्षात सीबीएसई अभ्यासक्रम कमी करावा, असे वाटते का? मग 'ही' बातमी वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे :तुम्हाला कोरोनाच्या संकटामुळे येत्या शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम कमी करण्यात यावा, असे वाटतय का?, त्यासाठी तुम्हाला काही उपाय सुचवायचा आहे का? तर तुम्ही थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि संबंधित मंत्रालयाला तुमचा सल्ला पाठवू शकता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होय, खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनीच असे आवाहन आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवर व्हिडिओद्वारे केले आहे. या व्हिडिओद्वारे ते म्हणतात, "कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात सीबीएसईचा अभ्यासक्रम कमी करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ यांच्याकडून विविध माध्यमातून होत आहे. हा अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला सातत्याने देण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्षक,  शैक्षणिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ यांच्याकडून अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात काय आणि कसे करता येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उपाय आणि सूचना मागितल्या आहेत." एका आठवडयाच्या आत यासंदर्भातील सूचना पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि खुद्द केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या ट्विटर किंवा फेसबुकवर तुम्हाला सूचना पाठविता येणार आहेत. "याद्वारे आलेल्या सूचनांवर विचार विनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल," असेही रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आपल्या ट्विटमधील व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT