unique protest by pune Citizens for Street light in baner 
पुणे

स्मार्ट पुणेकरांचा अनोखा निषेध; विजेच्या खांबावर लावल्या पेटत्या मशाली 

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी :  स्मार्ट पुण्यातील बाणेर  हद्दीतील बेलाकासा ते पाडळे वस्ती येथील रस्त्याच्या बाजूचे पथदिवे अनेक वर्ष बंद आहेत. तक्रार करूनही ते सुरू होत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी लहू बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत विजेच्या बंद खांबांना पेटत्या मशाली लावून हातात,  मशाली घेऊन मशाल आंदोलन केले आणि निषेध व्यक्त केला.                    

बाणेर -सुस- म्हाळुंगे शिवे जवळ बेलाकासा सोसायटी ते पाडळे  वस्ती या भागात मुख्य रस्त्यावरील विजेच्या खांबावर गेले वर्षभरापासून विद्युत दिवे बंद आहेत. रस्त्यावरील अंधारामुळे महिला,  ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. तसेच परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

पूजा भट्टला विसरलात का? दहा वर्षानंतर नव्या भूमिकेत

बाणेर बालेवाडी हा पुणे शहरातील स्मार्ट सिटी  म्हणून ओळखला जाते.  या भागात बहुसंख्य नागरिक हे आय. टी.  क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना अनेक वेळा नाईट शिफ्टला जावे लागते. या वेळी रस्त्यावर अंधार असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो,  त्यातच भटक्या कुत्र्यांकडूनही  दुचाकीचा माग  काढल्यामुळे वरचेवर अपघात होतच असतात. अशा परिस्थितीत या भागातील विजेचे दिवे बंद असल्यामुळे खांबांवर पेटत्या मशाली लावून, हातात ही पेटत्या मशाली घेऊन या भागातील नागरिकांनी एकत्र येत मशाल आंदोलन केले.      
           
''बाणेर हे  स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते आणि याच भागामध्ये साधी रस्त्यावरती विजेचे दिवे ही  नाहीत. हे स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेचे फळ आहे.  हे  पथदिवे चार दिवसात सुरू केले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी नागरिकांच्या वतीने दिला''.
- लहू बालवडकर

खुशखबर: ATM ला स्पर्श न करताही काढता येतील पैसे; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

'चार वर्षापूर्वी या ठिकाणी पथ दिव्याचे खांब बसविण्यात आले. परंतु गेल्या वर्षी येथे विद्युत दिवे लावण्यात आले. पण महापालिकेच्या विद्युत  विभागाकडून येथे वीज पुरवठा जोडला गेला नसल्यामुळे हे पथदिवे सुरू केले गेले नाहीत. अंधारामुळे आम्ही खूप त्रस्त झालो आहोत. तरी याची नोंद घेऊन या ठिकाणी त्वरित दिवे सुरू करण्यात यावेत''
-'योगेंद्र देशपांडे.यशवीन  सोसायटी, बाणेर      

''या ठिकाणी  बेलाकासा सोसायटी जवळ आठवडी बाजार सुरू झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. यावेळी येथे  टेबल तुटल्यामुळे  हे दिवे  बंद झाले आहेत. हे काम दोन तीन दिवसांमध्ये   करून नवीन  लाईन टाकून दिवे  सुरू करण्यात येईल. जे पथदिवे नादुरुस्त आहे तेही सुरु  केले जातील.'' 
- अशोक केदारी, कनिष्ठ अभियंता,  विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT