the United Nations has ordered airlines in member countries to pay passengers without giving them a credit cellthe United Nations has ordered airlines in member countries to pay passengers without giving them a credit cell 
पुणे

संयुक्त राष्ट्र संघाने सदस्य देशांतील विमान कंपन्यांना दिला हा आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाने सदस्य देशांतील विमान कंपन्यांना क्रेडिट सेलची सक्ती न करता प्रवाशांचा परताव्याचा अधिकार मान्य करीत पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच " क्रेडिट सेल'मध्ये पैसे ठेवून भविष्यात त्या बदल्यात नवी तिकिटे घेण्याची योजना अधिक आकर्षक व दीर्घ मुदतीची करावी. त्याची सक्ती प्रवाशांवर न करता त्यांच्या स्वेच्छेनुसार अमलात आणावी, अशाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांना पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!
कोविडच्या साथीला आवर घालण्यासाठी विविध देशांनी केलेल्या लॉकडाउनमुळे जागतिक स्तरावर जवळजवळ पंचेचाळीस लाख हवाई उड्डाणे रद्द करावी लागली. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आपली विमान तिकिटे आगाऊ विकत घेतली होती. उड्डाणे रद्द झाल्याने आपल्या तिकिटांचे पैसे परत मागण्यास ग्राहकांनी विमान कंपन्यांकडे सुरवात केली. परंतु दीड दोन महिने विमान सेवा ठप्प झाल्याने विमान कंपन्यांचे उत्पन्नसुद्धा थांबले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यावर विमान कंपन्यांनी प्रवाशांना प्रत्यक्ष परतावा देण्याऐवजी ते पैसे "क्रेडिट सेल' मधे ठेवू आणि एका वर्षांत केव्हाही प्रवासासाठी ते पैसे वापरता येतील, असे सांगायला सुरवात केली. ते करताना सुद्धा त्यातून काही पैसे कापून घेऊ असे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे प्रवाशांमध्ये याबाबत नाराजी पसरली होती. या प्रकरणी अनेकांनी मुंबई ग्राहक पंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. पंचायतीने या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाकडे पत्र व्यवहार करून त्यासाठी पाठपुरावा केला. 

पुणेकर भवानी पेठ परिसरात आता आहेत `एवढे` कोरोना बाधित

त्यावर संयुक्त राष्ट्र संघाने (युनायटेड नेशन) याबाबत सर्व सदस्य देशांना ग्राहक संरक्षण मार्गदर्शक सूचनांतर्गत सूचना देऊन आपापल्या देशांतील विमान कंपन्यांना क्रेडिट सेलची सक्ती न करता प्रवाशांचा परताव्याचा अधिकार मान्य करत प्रवाशांना परतावा देण्याचे आदेश द्यावेत, असे आदेश दिले. संयुक्त राष्ट्रसंघाने याबाबतच्या काढलेल्या आदेशात मुंबई ग्राहक पयायतीच्या उल्लेख केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे पंचायतीचे शिरीष देशपांडे ,अर्चना सबनीस, शर्मिला रानडे यांनी कळविले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रवासांच्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई ग्राहक पंचायतीने संयुक्त राष्ट्र संघाकडे दाद मागितली होती. या लढ्याला यश मिळाल्यामुळे प्रवाशांना पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पंचायतीने केलेली ही कामगिरी विशेष कौतुकास्पद आहे, असे ग्राहक पंचायतीचे न्यायविधी विभागाचे प्रमुख श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT