junnar 
पुणे

जुन्नरकरांनो, कोरोनाची भीती अजून संपलेली नाही... 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर शहरात तिसऱ्या लॉकडाउनच्या अखेरच्या टप्प्यात उघडण्यात आलेल्या दुकानातून होणारी गर्दी पाहून नागरिकांची कोरोनाची भीती संपली की काय, असा प्रश्‍न पडत आहे. 

पुणे व मुंबई आदी जिल्ह्यातून 'रेड झोन'मधून जुन्नर तालुक्‍यात येणारे नागरिक व दुकानातून सोशल डिस्टन्सिंगला नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे. मात्र, तो पोलिस व पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशात शहरी भागातून छुप्या मार्गाने तालुक्‍यात लोक येत आहेत. होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीही हिंडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व बाबी आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने सर्वसामान्य चिंताग्रस्त नागरिक या गर्दीत जाण्याचे टाळत आहे. 

जुन्नर शहरात जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानासह कापड, सोने- चांदी, स्टेशनरी, हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक आदी दुकानात नागरिकांची खरेदीसाठी होत असलेली गर्दी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नियमांचे पालन न करणाऱ्या दुकान मालकांवर खटले दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी सांगितले. 

भाजी व फळे विक्रेत्यांनी हातगाडीवर फिरून विक्री करावी, अशा सूचना असतानादेखील काही भाजी विक्रेते दुकान थाटून बसले आहेत. चारचाकी हातगाडीऐवजी छोट्या टेम्पोचा फळे व भाजीपाला विक्रीसाठी वापर होत आहे. त्यातून वाहतुकीची समस्या वाढली आहे. बाजारपेठेतून गाड्या हलविण्यासाठी पालिकेची गाडी फिरत असली, तरी नागरिक गाडीभोवती खरेदीसाठी गर्दी करून उभे होते. दुचाकी व चारचाकी वाहनांची रस्त्याच्या दोन्ही बाजूने रेलचेल होती. दुकाने उघडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे कोणी फारसे मनावर घेतले नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT