Pune Unofficial Pub sakal
पुणे

Pune Unofficial Pub : अनधिकृत पब, हॉटेलला राजाश्रय;पुण्यात कारवाई होऊन काही दिवसांत व्यवसाय सुरू

शहरातील अनधिकृत हॉटेल, पब, रूफटॉप हॉटेलचालकांना राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांत व्यवसाय सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

शहरातील अनधिकृत हॉटेल, पब, रूफटॉप हॉटेलचालकांना राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांत व्यवसाय सुरू होत आहे. यासाठी महापालिकेने पुणे पोलिसांना अनधिकृत हॉटेलची यादी देऊन फौजदारी कारवाईची मागणी केली होती. मात्र गेल्या पाच महिन्यांत काही कारवाई झालीच नाही. याउलट हॉटेलचालकांचा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचे समोर आले आहे.

कात्रज, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, भांडारकर रस्ता, कोंढवा, बिबवेवाडी, कोथरूड, आंबेगाव, धायरी, नऱ्हे, वारजे, लोहगाव, हडपसर, पिसोळी, उंड्रीसह इतर भागांत रूफटॉप हॉटेल सुरू झाले आहेत. इतर मोकळ्या जागा आणि नदीकाठच्या मोकळ्या जागांवर पब सुरू झाले आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अशा हॉटेलला परवानगी दिली जात नाही. तसेच एका खोलीचा परवाना घेऊन अख्ख्या गच्चीवर मोठे शेड मारून हॉटेलमधील सेवा पुरविली जात आहे.

इमारतीच्या बांधकामात चुकीच्या पद्धतीने अंतर्गत बदल केले जात आहेत. महापालिकेने दोन वर्षांपासून बेकायदा रूफटॉप हॉटेल, पबवर वारंवार कारवाई केली. अनधिकृत शेड मारल्याने मिळकतकर विभागाने तीन पट कर आकारला; तर काही ठिकाणी कारवाई केली. त्यानंतरही हॉटेल मालकांना काहीही फरक पडला नाही. शहरातील अनधिकृत हॉटेलवर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने पोलिस आयुक्तांकडे जानेवारीमध्ये केली होती. त्याबरोबर कोणते हॉटेल बेकायदा आहेत, त्यांचे मालक कोण आहेत, याची यादीही जोडली होती. त्यानंतर रूफटॉपच्या साइड मार्जिनचे कच्च्या किंवा पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून हॉटेल सुरू केलेल्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होतील अशी शक्यता होती; पण पुढे काहीही कारवाई झालेली नाही.

८९ अनधिकृत हॉटेल...

महापालिकेने पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये शहरात एकूण ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल आहेत. त्यापैकी ७६ हॉटेलला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९४९चे कलम ५३ नुसार नोटीस बजावण्यात आली. नोटिशीनंतर ५३ हॉटेलवर कारवाई झाली. सहा मालकांनी स्वतः अनधिकृत शेड उतरवून घेतले. सात हॉटेल बंद आहेत; तर नऊ हॉटेलवर गुन्हे दाखल केल्याचे नमूद आहे. मात्र पोलिसांना पत्र पाठविल्यानंतर पुढे काहीही झालेले नाही, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात शेकडो रूफटॉप हॉटेल सुरू आहेत. बांधकाम विभागाच्या रेकॉर्डवर केवळ ८९ हॉटेल दाखविल्याचे पत्रावरून स्पष्ट होत आहे.

फोन येताच कारवाई थांबली!

काही महिन्यांपूर्वी मुंढव्यात अनधिकृत बांधकाम करून पब सुरू झाले. तेथे होणारी गर्दी, कमी जागा, लावलेले पडदे, यामुळे आगीची घटना घडल्यास नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने पबवर कारवाई सुरू केली; मात्र राज्य मंत्रिमंडळातील एका बड्या नेत्याचा फोन येताच कारवाई थांबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा; चंपा चौकात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त

S26 येण्याआधीच Samsung चा मोठा धमाका! S25 Ultra मोबाईलवर थेट 58 हजारचा डिस्काउंट; खरेदीसाठी लागल्या रांगा, कुठे सुरुय ऑफर पाहा

लेकाशिवाय आयुष्य अपूर्ण, पण त्याचं स्वप्न पूर्ण करेन; वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल ७५ टक्के संपत्ती दान करणार, ३५ हजार कोटींची नेटवर्थ

SCROLL FOR NEXT